Skip to main content

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय


    

गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात खताची विशेषत: युरियाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आता पूर्ण हंगामात खताची टंचाई भासणार नाही कारण, केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

संग्रहीत छायाचित्र



Subscribe to Notifications

 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात खताची विशेषत: युरियाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आता पूर्ण हंगामात खताची टंचाई भासणार नाही कारण, केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यालाही मोठा आधार मिळणार आहे. कृषी सेवा केंद्रांनी कृत्रिम टंचाई भासवून लूट सुरु केली होती त्याला आता आळा बसणार आहे.


सध्या देशात रब्बी पिकांची पेरणी शिगेला पोहोचली असून, खताची कमतरता असल्याची तक्रार विविध राज्यांतील शेतकरी करत आहेत. खते मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने हिंदू बिझनेस लाइनला सांगितले की, पश्चिम किनारपट्टीवरील बंदरात 10 लाख टन आयात केलेले खत येईल तर 6 लाख टन पूर्व किनारपट्टीवर येईल. आयात केलेले खत देशात पोहोचून देशांतर्गत बाजारपेठेच्या पुरवठ्यासाठी इंडियन पोटॅश लिमिटेडला देण्यात येणार आहे.



उत्पादनापेक्षा मागणी अधिक,

भारतात दरवर्षी 25 लाख टन युरियाचे उत्पादन होते, परंतु देशांतर्गत युरियाची मागणी उत्पादनापेक्षा जास्त आहे, ज्याची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी 80 ते 90 लाख टन युरिया आयात करावा लागतो. सरकार वेळोवेळी गरज, मागणी, पुरवठा आणि किंमतींचे मूल्यांकन करून युरिया आयात करण्यास परवानगी देते. यावर्षी एप्रिल-जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत चीनकडून सुमारे 10 लाख टन युरिया आयात करण्यात आला होता. देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन चीनने आता निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता भारताला रशिया आणि इजिप्तमधून युरिया आयात करावा लागत आहे.


युरियाचा होतोय अधिक वापर

देशातील एकूण खतांच्या वापरापैकी 55 टक्के युरिया आहे. इतर खतांच्या किंमती ह्या अधिकच्या आहेत शिवाय त्यामुळे पिकांची वाढ होत नाही या कारणामुळे शेतकरी युरिया वापरणेच पसंत करतात. युरियाच्या 45 किलोच्या बॅगची कमाल किरकोळ बाजारात 242 असून 50 किलो बॅगची किंमत 268 रुपये आहे तर डीएपीच्या 50 किलो बॅगची किंमत 1200 रुपये आहे.


मागणी आणि झालेला पुरवठा

खत मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल-सप्टेंबर दरम्यान खरीप पेरणी हंगामासाठी युरियाची आवश्यकता 17 लाख 75 हजार टन एवढी होती तर उपलब्धता 20 लाख 82 हजार टन आणि 16 लाख 56 हजार टन होती. सध्याच्या रब्बी पेरणी हंगामाची मागणी अंदाजे 17 लाख 9 हजार टन आहे, तर २४ नोव्हेंबर रोजी उपलब्धता 5 लाख 44 हजार टन एवढी होती. याच रब्बी हंगामात 1 ऑक्टोबरपासून 4 लाख 41 हजार टन युरियाची विक्री झाली आहे. अशा परिस्थितीत आता या हंगामासाठी शेतकऱ्यांना केवळ 80 लाख टन युरिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे.




Comments

Popular posts from this blog

so sexy beauty✨😍❤

So sexy beauty😍✨❤

अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं

 अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं मुंबई: कोंकण की पृष्ठभूमि पर आधारित सीरीज 'रत्रिस खेल चले', एक परिवार में घटने वाली कुछ घटनाएं और उससे होने वाली भयावह घटनाएं दर्शकों के ध्यान में आईं.   सीरीज के पहले एपिसोड से लेकर तीसरे एपिसोड तक दर्शकों ने हर किरदार को अपनी प्रतिक्रिया दी।  सीरीज और उसमें मौजूद किरदारों को देखकर दर्शकों के मन में बसने लगे। अन्ना मत कहो, या शेवंता हो जो अपनी सेक्सी अदा से सभी को लुभाती है। ऐसा लग रहा था कि हर किरदार हर किसी को चाहिए। लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।  लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।

Viral Video:अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं

वायरल वीडियो: अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं  सेलेब्रिटीज को अपने कपड़ों से लेकर उनके व्यवहार के लिए आलोचना झेलनी पड़ती है