Skip to main content

ताज्या आवळ्याचा करा मस्त मोरावळा/मुरंबा! वर्षभर टिकेल, पचन सुधारेल, रेसिपी सोपी

ताज्या आवळ्याचा करा मस्त मोरावळा/मुरंबा! वर्षभर टिकेल, पचन सुधारेल, रेसिपी सोपी

By avi



How to make moravala/muramba? बाजारात छान टपोरे आवळे (Aamla) येणं सुरू झालं आहे.. मग करून टाका मस्त मुरंबा... पचन शक्ती सुधारेल, शिवाय आरोग्यालाही अनेक फायदे होतील... 


ताज्या ताज्या आवळ्याचा करा मस्त मोरावळा/मुरंबा! वर्षभर टिकेल, पचन सुधारेल, रेसिपी सोपी


ठळक मुद्दे

पाक चांगला पक्का झाला तर मोरावळा वर्षभर चांगला टिकू शकतो.

आवळ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे सर्व घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतात. 

काचेच्या बरणीत भरलेला पिवळट, चॉकलेटी मुरंबा पाहिला की पटकन तोंडात टाकावासा वाटतो.. आवळा हा मुळातच पौष्टिक आणि पाचक असतो. त्यात जेव्हा आपण त्याचा मुरंबा किंवा माेरावळा बनवतो, तेव्हा त्याची पौष्टिकता खूप जास्त वाढते. एकदा मोरावळा बनवला की तो वर्षभर चांगला टिकतो. रोज एक चमचा मोरावळा म्हणजे घरच्या घरी तयार केलेले टॉनिक (healthy tonic)... मोरावळा किंवा मुरंबा बनविण्याच्या अनेक रेसिपी (aamla muramba recipe)आहेत. यावर्षी ही एक रेसिपी (How to make moravala/muramba?) ट्राय करा आणि छान, चवदार मोरावळा बनवा..



 


मोरावळा बनविण्यासाठी लागणारे साहित्यदिड कप आवळ्याचे तुकडे, दिड कप साखर, ३/४ कप पाणी, अर्धा टी स्पून दालचिनी पावडर, ४ ते ५ लवंगा, १ टी स्पून विलायची पावडर.


आवळे ना उकडायचे, ना शिजवायचे; गॅस न वापरता करा खुटखुटीत आंबट गोड आवळा कॅण्डी!


कसा करायचा मोरावळा किंवा मुरंबाHow to make aamla moravala/muramba? - मोरावळा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आवळे स्वच्छ धुवून कापून घ्या.- आवळे कापण्याच्या दोन पद्धती आहेत. कुणी कुणी आवळ्याच्या पुर्ण फोडी करतात आणि बिया काढून टाकतात. तर कुणी आवळा पुर्णपणे कापत नाहीत. केवळ त्याला थोडे छेद देतात, बिया आवळ्यामध्ये तशाच राहतात. त्यामुळे यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल, त्यानुसार आवळे कापून घ्या.- कुकरमध्ये पाणी टाका. कापलेले आवळे कुकरमध्ये एका भांड्यात ठेवा. त्यावर झाकण ठेवा. आवळ्यात पाणी टाकू नका. वाफेवर आवळे शिजतील. दोन- तीन शिट्टया झाल्या की गॅस बंद करा. 



- तोपर्यंत दुसरीकडे एका कढईत साखर (sugar) आणि पाणी एकत्र करा आणि पाक तयार करा. पाक तयार करण्यासाठी साखर जेवढी घेतली असेल, त्याच्या निम्मे पाणी घ्यावे. पाक तयार करतानाच त्यात दालचिनी, लवंगा घाला. एकतारी पाक तयार झाला की त्यात शिजलेले आवळ्याचे तुकडे घाला आणि ८ ते १० मिनिटे शिजू द्या. - आवळ्याचा रंग बदलू लागला की गॅस बंद करा. काचेच्या बरणीत मुरंबा भरून ठेवा. - पाक चांगला पक्का झाला तर मोरावळा वर्षभर चांगला टिकू शकतो.- मोरावळा खराब होतो आहे असे वाटले, तर तो फ्रिजमध्येही ठेवू शकता.





video credit- Kabitaskitchen


आवळा मुरंबा खाण्याचे फायदे Benefits of eating aamla muramba- आवळ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी (vitamin c) आणि अँटीऑक्सिडंट्स (anti oxidants) आहेत. हे सर्व घटक रोगप्रतिकारक शक्ती (immunity)वाढविण्यास उपयुक्त ठरतात. - मुरंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या (aging effect) येणे कमी होते आणि चेहरा तजेलदार होतो. - ॲसिडीटीचा (acidity) त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे मुरंबा खावा.- भुक वाढण्यासाठी मुरंबा उपयुक्त ठरतो.- मोरावळा नियमित खाल्ल्याने पचनशक्ती (digetion)चांगली होते.- केसांचे आरोग्य (hair care)सुधारण्यासाठी मोरावळा उपयुक्त ठरतो.- मोरावळा नियमितपणे खाल्ल्याने शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स (body detox) होते. त्यामुळे रक्त शुद्ध होते.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

so sexy beauty✨😍❤

So sexy beauty😍✨❤

अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं

 अन्ना नाइक ही नहीं बल्कि नई बोल्ड शेवंता सभी के दिलों को याद कर रही हैं मुंबई: कोंकण की पृष्ठभूमि पर आधारित सीरीज 'रत्रिस खेल चले', एक परिवार में घटने वाली कुछ घटनाएं और उससे होने वाली भयावह घटनाएं दर्शकों के ध्यान में आईं.   सीरीज के पहले एपिसोड से लेकर तीसरे एपिसोड तक दर्शकों ने हर किरदार को अपनी प्रतिक्रिया दी।  सीरीज और उसमें मौजूद किरदारों को देखकर दर्शकों के मन में बसने लगे। अन्ना मत कहो, या शेवंता हो जो अपनी सेक्सी अदा से सभी को लुभाती है। ऐसा लग रहा था कि हर किरदार हर किसी को चाहिए। लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।  लेकिन अब सीरीज में शेवंता की भूमिका निभा रहे अपूर्वा नेमालेकर ने इससे किनारा कर लिया है। इसके बजाय, श्रृंखला से एक नया चेहरा उभरना शुरू हो गया है।

Viral Video:अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं

वायरल वीडियो: अपनी ड्रेस को लेकर ट्रोल हो रही हैं जाह्नवी कपूर! नेटिज़न्स की मिश्रित प्रतिक्रियाएं  सेलेब्रिटीज को अपने कपड़ों से लेकर उनके व्यवहार के लिए आलोचना झेलनी पड़ती है