शरीराच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; त्यांची जीवनात होते भरभराट
हस्तरेषाशास्त्रानुसार मानवी शरीरावर असलेले सर्व तीळ (mole on the Skin) अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की शरीरावर लाल तीळ असणे देखील शुभ मानले जाते. तसेच शरीराच्या इतर भागात काळे तीळ ( black mole) असल्याने शुभ आणि अशुभ असे वेगवेगळे परिणाम होतात.
शरीराच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; त्यांची जीवनात होते भरभराट
NEW
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : हस्तरेषाशास्त्रानुसार मानवी शरीरावर असलेले सर्व तीळ (mole on the Skin) अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की शरीरावर लाल तीळ असणे देखील शुभ मानले जाते. तसेच शरीराच्या इतर भागात काळे तीळ ( black mole) असल्याने शुभ आणि अशुभ असे वेगवेगळे परिणाम होतात. यासोबतच शरीरावरील चामखीळींचा तिळासारखा प्रभाव असतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तिळांचा अर्थ जाणून घेऊया.
ओठावरील तीळ
स्त्री-पुरुषाच्या ओठांच्या (Lips) उजव्या बाजूला तीळ असल्यास त्यामुळे त्यांचे जोडीदाराशी प्रेमाचे नाते असते. त्यांच्यात खूप छान नातं असतं. तर विरुद्ध बाजूच्या म्हणजेच ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास, जोडीदाराशी मतभेद होतात. तर दुसरीकडे ज्या लोकांच्या खालच्या ओठांवर तीळ असतो ते खाण्यापिण्याचे शौकीन असतात. तसेच असे लोक त्यांच्या क्षेत्रात चांगले यश मिळवतात.
छातीवर तीळ
डाव्या बाजूला तीळ किंवा चामखीळ असेल तर त्या व्यक्तीचे जास्त वयानंतर लग्न होण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती जास्त कामवासनेत असतात. त्यांना हृदयविकार होण्याचीही शक्यता असते. दुसरीकडे, ज्या व्यक्तीच्या छातीच्या उजव्या बाजूला तीळ असतो, ते धनवान असतात आणि त्यांचा जोडीदारही सुंदर आणि योग्य असतो.
हे वाचा - सर्दी-पडशाचे विषाणू कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवतात; नवीन संशोधनातील माहिती
तळहातावर तीळ
तळहातावरच्या अंगठ्याच्या खालच्या भागाला शुक्र पर्वत म्हणतात. ज्यांच्या तळहातावर तीळ असतो, त्यांना जीवनात अपार यश मिळते. अंगठ्यावर तीळ असेल तर व्यक्तीने कितीही चांगले काम केले तरी त्याला प्रसिद्धी मिळत नाही.
पोटावर तीळतीळ
ज्या लोकांच्या पोटावर तीळ असतात ते खूप खाऊबाज असतात. जर तीळ नाभीच्या डाव्या बाजूला असेल तर त्या व्यक्तीला पोटाचा त्रास होतो. ज्यांच्या नाभीच्या खाली तीळाची खूण असते. ते लैंगिक संक्रमित आजारांना बळी पडतात.
हे वाचा - Safe Ear Cleaning: कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा
कपाळावर तीळ
ज्या व्यक्तीच्या कपाळावर उजवीकडे आणि डावीकडे तीळ असतो, तो खूप पैसा कमावतो पण आनंदाच्या गोष्टींवर पैसे खर्च करतो. अनेक वेळा त्यांना आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. दुसरीकडे ज्या लोकांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो ते खूप भाग्यवान असतात. नशीब अशा लोकांना मदत करते, ज्या क्षेत्रात ते प्रयत्न करतात त्यात ते यशस्वी होतात.
healthlifestyle
Home » News » Lifestyle »New Year 2022 Vastu Tips: नवीन वर्षापूर्वीच घरात आणा या वस्तू, वास्तू दोष दूर होऊन नशीब चमकेल
New Year 2022 Vastu Tips: नवीन वर्षापूर्वीच घरात आणा या वस्तू, वास्तू दोष दूर होऊन नशीब चमकेल
New Year 2022 Vastu Tips: बरेच लोक त्यांच्या घरात कासव ठेवतात. परंतु, बहुतेक ते माती किंवा लाकडापासून बनवलेलं असतं. घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी तुम्ही घरात धातूचं कासव ठेवू शकता. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही पितळ, कांस्य किंवा चांदीचं कासव तुमच्या घरी आणू शकता.
New Year 2022 Vastu Tips: नवीन वर्षापूर्वीच घरात आणा या वस्तू, वास्तू दोष दूर होऊन नशीब चमकेल
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : नवीन वर्षात प्रत्येकाला बरंच काही चांगलं होण्याच्या अपेक्षा असतात. येणारं नव्या वर्षाची सुरुवातच फक्त आपल्यासाठी आनंदाची नाही तर, वर्षारंभापासून वर्षाअखेरीपर्यंत आपल्या घरात सुख-समृद्धी टिकून रहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या आशेनं येणारं वर्ष चांगलं जाण्यासाठी लोक किती उपाय करतात, याचा विचारही करणं शक्य नाही. यात ज्योतिष, वास्तुशास्त्र, शुभ समजल्या वस्तू यांचाही समावेश केला जातो 2022 साल येण्यासाठी आता फक्त काही काळ (New Year 2022 Vastu Tips) उरला आहे.
वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू शुभ मानल्या जातात आणि त्या आणल्यानं नशिबाचे दरवाजे उघडू शकतात, अशी अनेकांची धारणा असते, ते जाणून घेऊया.
धातूचे कासव
बरेच लोक त्यांच्या घरात कासव ठेवतात. परंतु, बहुतेक ते माती किंवा लाकडापासून बनवलेलं असतं. घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी तुम्ही घरात धातूचं कासव ठेवू शकता. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही पितळ, कांस्य किंवा चांदीचं कासव तुमच्या घरी आणू शकता. याच्यामुळं तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास मदत होईल, असं मानलं जातं.
चांदीचा हत्ती
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरात चांदीचा हत्तीदेखील ठेवू शकता. पण हा हत्ती घन चांदीचा असावा. वास्तुशास्त्रानुसार याचा घरावर खूप चांगला प्रभाव पडतो आणि राहू आणि केतूचा वाईट प्रभाव संपुष्टात येऊ लागतो. चांदीचा हत्ती घरात ठेवल्यानं व्यवसायात वृद्धी होते आणि नोकरीत प्रगती होते. यासोबतच घरात सुख-शांती आणि समृद्धी राहते.
मोरपीस
नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरात मोराची पिसे देखील ठेवू शकता. मोरपीस अतिशय शुभ आणि चमत्कारिक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, मोराची पिसं घरात ठेवल्यानं नशिबाच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतात. परंतु एकाच वेळी अनेक मोराची पिसं घरात ठेवण्याऐवजी फक्त एक ते तीन मोराची पिसं घरात ठेवावीत, असं म्हटलं जातं.
हे वाचा - Best Time To Drink Milk: आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी या वेळी प्या दूध, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य पद्धत
मोत्याचं कवच असलेला शिंपला
नवीन वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या घरात मोती शिंपल्यालाही स्थान देऊ शकता. मोतीशिंपल्याची विधीपूर्वक पूजा करून तिजोरीत किंवा पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यानं घरामध्ये धन-संपत्तीचा वास राहतो. त्यामुळे व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते आणि धनलाभ होतो, असं सांगितलं जातं.
हे वाचा - Cancer : कॅन्सरमुळे अंगावरील तीळाचा असा बदलतो रंग, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती
पोपट
तुम्ही तुमच्या घरात पोपटाचं चित्र किंवा मूर्तीदेखील ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पोपटाचं चित्र लावल्यानं घरात सुख-समृद्धी येते. यासोबतच मुलांची अभ्यासातही रुची वाढते आणि नशिबाचे दरवाजे उघडू लागतात, असं काहीजण
Comments
Post a Comment