निरोगी शरीरासह तुमचा मेंदुही निरोगी ठेवायचाय? 'या' पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा
Health Care Tips : तुमच्या मेंदुचे आरोग्य चांगलं राहीले तर तुम्ही कोणतेही काम उत्तम प्रकारे करु शकता. मेंदुला निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही गोष्टी समाविष्ट केल्याने फायदा होऊ शकतो.
निरोगी शरीरासह तुमचा मेंदुही निरोगी ठेवायचाय? 'या' पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा
Health Care Tips : एखाद्या व्यक्तीकडे चांगले धष्टपुष्ट शरीर असेल, मात्र मेंदुचे आरोग्य ठीक नसेल, तर अशा व्यक्तींना मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी तुम्हांला सुदृढ शरीरासोबतच मेंदुचा वापरही योग्यप्रकारे करता आला पाहिजे. तुमच्या मेंदूचं आरोग्य उत्तम असेल, तर तुम्ही कोणतेही काम सहजपणे पूर्ण करु शकता. मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात काही पोषक गोष्टींचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊयात, मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासोबतच बुद्धी तल्लख करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या पदार्थांबाबत...
भोपळ्याच्या बिया : भोपळ्याची भाजी आपण खातोच. यासोबतच भोपळ्यापासून बनणाऱ्या अनेक गोड पदार्थांचा आस्वादही तुम्ही घेतला असेल. मात्र, तुम्हांला भोपळ्याच्या बिया किती गुणकारी आहेत, हे ठाऊक नसेल. मेंदुचं आरोग्य जपण्यासाठी आणि बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बियांचा वापर करु शकता. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने तुम्ही मेंदू तंदुरुस्त ठेवू शकता. भोपळ्यामध्ये असलेले झिंक मेंदूसाठी लाभदायक असते.
डार्क चॉकलेट : सध्याच्या युगात डार्क चॉकलेट सूपर फूडपैकी एक आहे. जर तुम्हांलाही डार्क चॉकलेट खायला आवडतं असेल, तर तुम्ही त्याचे फायदे नक्कीच जाणून घ्या. डार्क चॉकलेट तुमचे मेंदुचे कार्य प्रभावी करण्यासाठी आणि तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. डॉर्क चॉकलेटमधील अॅन्टीऑक्सिडेंड आणि कार्बनिक तत्त्व रक्तदाब नियंत्रित करण्यात उपयोगी आहेत.
ब्रोकली : मेंदुसाठी ब्रोकली गुणकारी आहे. ब्रोकलीमध्ये ओमेगा-3, फॅटी अॅसिड, लोह, तांबे यासारखी पोषकतत्वे आहेत. ही पोषकतत्वे तुमच्या मेंदुच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Comments
Post a Comment