National Family Health Survey : भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक, काय सांगतो कौटुंबीक आरोग्य सर्वे?
National Family Health Survey : भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक, काय सांगतो कौटुंबीक आरोग्य सर्वे?
भारताची लोकसंख्या १३५ कोटींवर गेली आहे. पण पुढच्या काही वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या हळूहळू स्थितर होण्याची चिन्ह आहे. देशातील कौटुंबीक आरोग्य सर्वेक्षण समोर आले आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक असल्याचे दाखवण्यात आले आहे.
नवी दिल्लीः भारतात लोकसंख्याशास्त्रीय बदलाचे ठोस संकेत राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS)पाचव्या आवृत्तीतून देण्यात आले आहेत. १९९२ मध्ये NFHS सुरू झाल्यानंतर प्रथमच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. १,००० पुरुषांमागे १,०२० महिला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणाच्या मागील आवृत्तीत २०१५-१६ मध्ये हा दर १,००० पुरुषांमागे ९९१ महिला होत्या.
nfhs survey family health survey suggests more women than men in india
भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक, काय सांगतो कौटुंबीक आरोग्य सर्वे?
दर दहा वर्षांनी होणारी जनगणना ही भारतातील लोकसंख्येच्या ट्रेंडचे अधिकृत चिन्ह मानली जाते आणि हा व्यापक लक्ष ठेवणारा कार्यक्रम आहे. NFHS सर्वेक्षण लहान आहेत. परंतु, जिल्हा स्तरावर आयोजित केले जातात आणि भविष्यासाठी एक सूचक आहेत. गेल्या पाच वर्षांत जन्मलेल्या मुलांचे लिंग गुणोत्तर प्रति १,००० पुरुषांमागे ९१९ वरून २०१५-१६ मध्ये केवळ ९२९ महिला प्रति १,००० पुरुष इतके सुधारले. सरासरी हे अधोरेखित करते की मुलींपेक्षा मुलांमध्ये जगण्याची चांगली शक्यता आहे,
बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये (UTs) पुरुषांपेक्षा जास्त महिला असल्याचे NFHS-5 दाखवते. गुजरात, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर, चंदीगड, दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगर हवेली आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांपेक्षा कमी महिला होत्या. आता या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी महिलांच्या लोकसंख्येच्या वाढीमध्ये सुधारणा दर्शविली आहे.
NFHS चा राज्यनिहाय डेटा बघितल्यास भारत आपली लोकसंख्या स्थिर करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा एकूण जन्मदर (Total Fertility Rate TFR) दोनपेक्षा कमी आहे. २.१ पेक्षा कमी टीएफआर किंवा सरासरी दोन मुले जन्माला घालणारी स्त्री लोकसंख्या नियंत्रणाचे संकेत देत आहे. दोन पेक्षा कमी मुले ही लोकसंख्येमध्ये होणारी घट सूचित करते. बिहार, मेघालय, मणिपूर, झारखंड आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये दोनपेक्षा जास्त TFR आहे. बिहारमध्ये ३ TFR आहे, जो NFHS-4 च्या ३.४ तुलनेत सुधारणा दर्शवणार आहे. महिला सशक्तीकरणात सर्व राज्यांमध्ये टीएफआर गेल्या पाच वर्षांत सुधारला आहे.
भारताची लोकसंख्या २०४०-२०५० मध्ये सुमारे १.६ ते १.८ अब्जपर्यंत जाईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाने वर्तवला आहे. सध्याच्या अंदाजानुसार भारत अजूनही जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून आहे.
भारत २०३१ च्या आसपास लोकसंख्येत चीनलाही मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून पुढे जाईल, असा गेल्या वर्षीच्या एका सरकारी अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांच्या २०२२ च्या अंदाजापेक्षा जवळजवळ एक दशक नंतर, भारत चीनला मागे टाकेल.
एक उल्लेखनीय अपवाद म्हणजे केरळ, १,१२१ वर महिला आणि पुरुषांचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य आणि NFHS-4 मध्ये १,०४९ पेक्षा जास्त सुधारणा नोंदवली गेली. केरळमधील TFR १.६ वरून १.८ पर्यंत वाढला आहे. गेल्या पाच वर्षांत जन्मलेल्या बालकांच्या लिंग गुणोत्तरातही घट झाल्याचे राज्याने नोंदवले आहे. २०१५-१६ मध्ये प्रति १,००० पुरुषांमागे १,०४७ स्त्रिया होत्या. आता प्रति १,००० पुरुषांमागे त्यात घसरण होऊ ९५१ पर्यंत आल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात समाविष्ट २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील NFHS-5 चे निष्कर्ष डिसेंबर २०२० मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आणि उर्वरित अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, हरयाणा, झारखंड, मध्य प्रदेश, दिल्लीचे NCT, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांचे निष्कर्ष बुधवारी जाहीर करण्यात आले.
NFHS-5 सर्वेक्षणात देशातील ७०७ जिल्ह्यांतील कुटुंबांमधून (मार्च, २०१७ पर्यंत) सुमारे ६.१ लाख नमुने घेतले आहे. यात ७२४,११५ महिला आणि १०१,८३९ पुरुषांचा समावेश करून जिल्हा स्तरापर्यंत भिन्न अंदाज समोर मांडले.
Women population in indianational family health survey (nfhs) reportnational family health survey (nfhs)national family health surveymen population in indiaindia's population
Comments
Post a Comment